ऑनलाईन टीम / पुणे :
रमा-माधव रानडे स्मृती समितीतर्फे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 120 व्या स्मृतीदिनानिमित्त ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ. गो. ब. देगलुरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. दिलीप जोग यांनी दिली.
डॉ. गो. ब. देगलुरकर यांच्या हस्ते न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर देगलुरकर यांचे प्रबोधन पुरुष न्या. महादेव गोविंद रानडे या विषयावर व्याख्यान होणार आहे.
डॉ. दिलीप जोग म्हणाले, न्या. महादेव गोविंद रानडे यांचे व्यक्तीमत्त्व व त्यांनी केलेले कार्य याचा तरुणांनी आदर्श घ्यावा तसेच त्यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात.








