डीआरडीओ करणार विकसित – निर्मितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी करार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय नौदलाने मंगळवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत करार केला आहे. या कराराच्या अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे नेव्हल अँटी ड्रोन सिस्टीम (एनएडीएस) विकसित करणार आहे. हार्ड किल आणि सॉफ्ट किल या दोन्ही क्षमता असणारे याचे प्रकार तयार केले जाणार आहेत.
हार्ड किल अँटी ड्रोन सिस्टीममध्ये अँटी एअरक्राफ्ट वेपन देखील असते, तर सॉफ्ट किल ड्रोन सिस्टीमचा वापर इन्फ्रारेडचा सुगावा लावण्यासाठी केला जातो. एनएडीएस सहजपणे मायक्रो ड्रोनचा थांगपत्ता लावून त्याचे नेटवर्क जाम करू शकते. यात लेझर आधारित किलिंक मॅकेनिजमचा वापर केला जाणार आहे. एनएडीएसची निर्मिती डीआरडीओकडून केली जात आहे. याचे उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करणार आहे.