हॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध प्रँचाइजी ‘जेम्स बाँड’चा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’चे प्रदर्शन आता 6 महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आले आहे. महामारीमुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता 2 एप्रिल नव्हे तर 8 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. जेम्स बाँड सीरिजमधील चित्रपट केवळ चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. अभिनेता डॅनियल क्रेगचा हा बाँड सीरिजमधील अखेरचा चित्रपट असणार आहे. यापूर्वी त्याने या प्रँचाइजीच्या ‘क्वांटम ऑफ सोलेस, स्कायफॉल, कसिनो रॉयल, स्पेक्टर 007’ या चित्रपटांमध्ये जगविख्यात पात्र साकारले आहे.
Previous Articleशिवसेना नेत्यांवर बेळगावात एफआयआर
Next Article खासगी सावकाराकडून भाजी व्यापाऱयाला धकमी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









