कोरोनामुळे लाँचिंग पडले होते लांबणीवर – अत्याधुनिक सुविधांयुक्त कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सणासुदीच्या कालावधीसोबत नोव्हेंबर महिन्यात जर का आपण कार खरेदी करावयाचा विचार करत असाल आपल्याला सुवर्णसंधी मिळणार आहे. कारण या महिन्यात काही कंपन्या भारतामध्ये 8 कार्सचे सादरीकरण करणार असल्याचे समजते. यात बजेट, महाग, स्पोर्टस आणि इलेक्ट्रिक सेगमेंटच्या गटातील कार्सचा समावेश असणार आहे.
काही निवडक कार्स खालीलप्राणे
1.2021 मारुती सेलेरियो
भारतामध्ये लवकरच सेलेरियो हॅचबॅकची फेसलिफ्ट मॉडेल येणार आहे. कंपनीची न्यू जनरेशन हॅचबॅक कार चालू महिन्यात लाँच होणार आहे.
2.फोक्सवॅगन टायगून ः
याच महिन्यात फोक्सवॅगन टायगून सादर करण्यात येणार आहे. यासंबंधीची तयारी ही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. कंपनीने याबाबतीत अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.
3.ऑडी क्यू 5
ऑडी क्यू 5 एसयूव्ही एक वर्षांनंतर भारतीय बाजारात पुन्हा परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑडीने साधारणपणे नवीन जनरेशनची क्यू5 सादर केली होती. ही गाडी बीएस6 पेट्रोल इंजिन, नवीन डिझाईन आणि फिचरसोबत येणार आहे.
4.स्कोडा स्लेविया ः
स्कोडा स्लेविया कंपनीची दुसरी कार सादर होणार आहे, जी एमक्यूबी-एओ प्लॅटफॉर्म बेसड्वर आधारीत आहे. साधारणपणे स्कोडाने या कारची कार्यालयीन चाचणी करण्याची माहिती दिली आहे.
5.मर्सिडीज बेंझ एएमजी ए 45 एस
मर्सिडीज बेंझ इंडिया देशात आपली आणखी एक दमदार कार आणण्याच्या तयारी आहे. जर्मन लक्झरी कार निर्माती कंपनी 17 नोव्हेंबरला भारतामध्ये एएमजी ए45 एस आणणार आहे.
6.पोर्शे टेकॅन ईव्ही
कोविड महामारीमुळे आपल्या सर्व कारचे सादरीकरण थांबविले आहे. अंतिमतःहा कंपनीने 12 नोव्हेंबर रोजी भारतात आपले प्रमुख मॉडेल टेकॅन इलेक्ट्रिक मॉडेल आणण्याचे निश्चित केले आहे.
7.मिनी कुपर एसइ
बीएमडब्ल्यू चालू महिन्यात भारतामध्ये ऑल इलेक्ट्रिक मिनी कुपर एसइ आणण्याच्या तयारीत आहे. बीएमडब्ल्यूने इव्हीचे बुकिंग एक लाख रुपयामध्ये करण्याची संधी प्राप्त केली आहे.
8.पोर्शे मॅकॅन
पोर्शे मॅकॅनचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करण्यात येणार आहे. यामध्ये 2.0 लिटर फोर सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन मिळणार आहे.









