प्रतीक गांधी, दिव्येंदु शर्मासोबत झळकणार
अभिनेत्री नोरा फतेही दीर्घकाळापासून महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरून चर्चेत आहे. स्वतःच्या नृत्यक्षमतेने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा आता स्वतःचा अभिनय दाखवून देणारा आहे. अभिनेत्री लवकरच कुणाल खेमूचा चित्रपट ‘मडगाव एक्स्प्रेस’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात नोरा पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारताना दिसून येईल. याचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती नोराने दिली आहे.
नोराने काही छायाचित्रे शेअर केली असून यात ती कुणाल खेमू, फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि अन्य कलाकारांसोबत दिसून येते. कुणाल, फरहान आणि रितेश यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि प्रतिभावंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला दिली. अखेर मी आता अभिनयाच्या झोनमध्ये आल्याचे नोराने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

कुणाल एक उत्तम दिग्दर्शक असून त्याने माझ्यातील अभिनयक्षमतेचा पूर्ण वापर केला आहे. मी सर्वांची आभारी असून सेटवर बरेच काही शिकायला मिळाल्याचे तिने म्हटले आहे. ‘मडगाव एक्स्प्रेस’ या चित्रपटात प्रतीक गांधी, दिव्येंदु शर्मा आणि अविनाश तिवारी हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहे.
या चित्रपटाद्वारे कुणाल हा पहिल्यांदाच दिग्दर्शनाची जबाबदारी पेलतत आहे. तर चित्रपट निर्मितीची जबाबदारी फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी घेतली आहे. स्वतःच्या नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाणाऱया नोराने काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. परंतु ती अद्याप कुठल्याही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आलेली नाही. नोरा याचबरोबर लवकरच साजिद खानच्या चित्रपटात दिसून येणार आहे.









