ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
मुलींच्या शिक्षणाची प्रचारक आणि नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई, ही विवाहबंधनात अडकल्याचे तिने मंगळवारी सोशल मीडियावर सांगितले. ब्रिटनमध्ये राहणारी 24 वर्षीय सामाजिक कार्यकर्ती म्हणाली की, तिने आणि तिचा जोडीदार ज्याचे नाव असेर असे असुन दोघांनी बर्मिंगहॅम शहरात त्यांच्या कुटुंबासह घरी लग्न आहे.
“आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान दिवस आहे. असेर आणि मी आयुष्यभर एकमेकांचे भागीदार होण्यासाठी बंधनात अडकलो आहोत ” असे तिने ट्विटरवर लिहून पोस्टमध्ये चार फोटो टाकले आहेत. मलालाने तिच्या पतीच्या नावाशिवाय इतर कोणतीही माहिती दिली नाही. पण तिच्या फॉलोअर्सनी असेर याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे सरव्यवस्थापक असेर मलिक म्हणून ओळखले.
मलालाला जगाच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये, तिच्या धैर्यासाठी आणि मुली आणि महिलांच्या हक्कांसाठी कार्य करण्यासाठी तिच्या वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानमध्ये तिच्या कार्यामुळे महीलांविषयी चांगले जनमत तयार झाले आहे.पण जुलैमध्ये मलालाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की ती लग्न करेल की नाही याची खात्री नाही. “मला अजूनही समजले नाही की लोकांना लग्न का करावे लागते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती हवी असेल तर तुम्हाला लग्नाच्या कागदपत्रांवर सही का करावी लागते. या टिप्पणीवर त्यावेळी पाकिस्तानमधील अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी टीका केली होती.









