वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
नोकिया कंपनीने आपला 43 इंच आकाराचा स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात सादर केला आहे. सदर टीव्हीची किंमत 31,999 रुपये आहे. स्मार्ट अँड्रॉईड टीव्हीमध्ये विशेष सुविधा असून यात 4 के युएचडी एलइडी डिप्ले पॅनेल, जेबीएल ऑडिओ आणि डॉल्बीची सुविधा मिळणार आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून ऍक्सिस बँक पेडिट कार्डच्या खरेदीवर 10 टक्क्मयापर्यंत सवलत मिळणार आहे. सदरची विक्री ही येत्या 8 जूनपासून सुरु होणार आहे. कोविड19 च्या संकटामुळे सदरच्या टीव्हीचे सादरीकरण लांबणीवर पडले होते. या अगोदर डिसेंबर 2019 मध्ये 55 इंच आकाराचा स्मार्ट टीव्ही सादर केला होता.









