प्रतिनिधी / सांगली
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनारमध्ये शासनाच्या विविध योजनेमधून स्वयंरोजगारासाठी बँक कर्ज प्रकरण कसे करावे या विषयावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विशाल पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सहायक आयुक्त ज. बा. करीम तसेच रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांचा सहभाग असणार आहे.
इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/byj-aqtw-fkg सेमिनारच्या या लिंकवर दि. 26 ऑगस्ट 2021 रोज विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर सेमिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.








