प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ठकसेन महिलेने फसवणूक करीत, पाच लाख रुपयांला गंडा घातला. श्रीमती सुलोचना वसंत सावंत (वय 55, रा. सासणे इस्टेट, शिंदे लॉनच्या पाठीमागे, टिंबर मार्केट, कोल्हापूर) असे फसवणूक करणार्या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधी गौरी सचिन लोखंडे (वय 26, रा. कोरगांवकर शाळेसमोर, सदर बाजार, कोल्हापूर) या महिलेने ठकसेन सावंत महिलेविरोधी राजारामपूरी पोलिसात फिर्याद दिली आहे. तसेच ठकसेन सावंत विरोधी फसवणूकीचा आठवडाभरातील हा दुसरा गुन्हा आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, आरोपी सुलोचना सावंत हिची गौरी लोखंडे या महिलेबरोबर ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेवून तिने गौरीचा विश्वास संपादन केला. तिला तिने कोल्हापूर महानगरपालिकेत शिपाई आणि क्लार्कची नोकरी लावतो असे सांगून वेळोवेळी भुल थापा मारुन पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर गौरीने नोकरीसाठी सावंत हिच्याकडे तगादा लावला. त्यावेळी सावंत हिने आपली नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने तिच्या विरोधी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.









