ऑनलाईन टीम / ओस्लो :
नॉर्वेत फायझर-बायोएनटेकची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नॉर्वेच्या आरोग्य विभागाने या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नॉर्वेचे वैद्यकीय संचालक स्टेइनार मॅडसेन म्हणाले, नॉर्वेत फायझर-बायोएनटेकची लस घेतल्यानंतर आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 13 जणांचा मृत्यू या लसीमुळे झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे 13 मृत 80 वर्षावरील होते. त्यामधील काहींना हृदयाचे आजार होते. लस घेतल्यानंतर त्यांना ताप आणि इतर काही साईड इफेक्ट जाणवले असतील, त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर उर्वरित इतर मृतांचा आणि लसीचा काही संबंध आहे का, याची अधिक चौकशी सध्या सुरू आहे, असेही मॅडसेन म्हणाले.









