प्रतिनिधी/ बेळगाव :
देशभर कोरोनाचा हाहाकार सुरू असल्याने सर्व वाहतूक सेवा बंद आहेत. या काळातही रेल्वेकडून माल व पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने एकूण 700 टन मालवाहतूक केली आहे. बेंगळूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये 15 हून अधिक पार्सल व मालवाहतूक करणाऱया रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अन्नधान्य व इतर सेवा वेळेत पुरविणे शक्मय झाले आहे.
रेल्वेने औषधे, दूध व इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी पार्सल रेल्वे सुरू करण्यात आली होती. साखर, तांदूळ, गहू, डाळ यांच्या वाहतुकीसाठी मालगाडय़ा सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे कमी वेळेत मालाची वाहतूक करणे शक्मय झाले. बेळगावच्या देसूर येथील रेल्वेस्थानकावर हा माल उतरविण्यात येत आहे. तेथून गोडाऊन व तेथून जिल्हय़ाच्या विविध भागांमध्ये तो माल पोहचविला जात आहे.









