प्रतिनिधी/ बेळगाव
हैदराबाद येथील मौला अली, आरपीएफ टेनिंग सेंटरमधून 164 महिला सब इन्स्पेक्टर म्हणून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. यातील 7 महिला सबइन्स्पेक्टर नैर्त्रुत्य रेल्वेमध्ये दाखल झाल्या आहेत. 9 महिन्यांच्या खडतर शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षणानंतर या महिला सेवेत दाखल झाल्या आहेत.
रेल्वेमध्ये प्रवासी सुरक्षा, रेल्वे मालवाहतूक व रेल्वे सुरक्षा यासाठी या नेमणुका करण्यात येणार आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेच्या विविध रेल्वेस्थानकांवर त्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. यामध्ये नम्रता अंगडी या धारवाड येथील महिलेचा समावेश आहे. हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमधून इलेक्ट्रीकल ऍण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले आहे.