प्रतिनिधी /बेळगाव
नेहरुनगर, तिसरा क्रॉस येथील मुख्य रस्त्यावर पाण्याला गळती लागली आहे. मागील दोन महिन्यांपासून गळती सुरू असूनही पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असून ही गळती दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. मुख्य रस्त्यावरच गळती लागल्यामुळे रस्ताही खराब होत आहे. पाणी थांबून राहिल्याने रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. खड्डय़ांमध्ये पाणी साचून राहिल्याने वाहने या पाण्यातून गेल्यास पाणी इतरांवर उडत आहे. एकीकडे उन्हाळय़ामध्ये पाण्याचा तुटवडा तर दुसरीकडे अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.









