ऑनलाईन टीम / तरुण भारत
विरोधी पक्षांनी आरोप केल्याप्रमाणे युक्रेन – रशिया युद्ध सुरु असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचारात व्यस्त होते. तसेच युद्धाच्या भडक्यात भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले असताना पंतप्रधान मात्र हिमालयातील शंकर मंदीरात डमरु वाजवत आहेत. असा ही आरोप विरोधी पक्ष करत आहेत. यातच भर म्हणुन यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली. तसेच युक्रेनमधील भारतीयांच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
हिंदुस्थान सामर्थ्यवान असल्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांची रशिया-युक्रेन सीमेवरून सुटका होऊ शकली, असे प्रचारावेळी भाष्य पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात केले. सत्य हे आहे, की हजारो विद्यार्थ्यांना पहिले आठ दिवस वालीच नव्हता. उपाशी चालत शेकडो मैल ही मुलं पोलंड, रुमानिया, स्लोव्हाकियाच्या सीमेवर बेवारस अवस्थेत उभी होती”, असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.
तसेच संजय राऊतांनी भाजपवर खोचक निशाणा साधताना “ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करत राहिले, तोच अलिप्तवाद त्यांना रशिया-युक्रेन वादात ‘युनो’मध्ये स्वीकारावा लागला! नेहरूंच्या धोरणानेच पंतप्रधान मोदींना वाचवले”, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एखदा भाजपवर निशाना साधला आहे. यावर भाजप कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.









