वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्विर्त्झलंडची खाद्य आणि पेय उद्योगातील नेस्ले इंडिया कंपनी आगामी पाच वर्षांसाठी आपल्या पुर्नर्निमितीसह अन्य विभागात ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये कपात करण्यासाठी तब्बल 3.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन निम्यावर तसेच 2050 पर्यंत निव्वळ स्वरुपात शून्यावर आणण्याची तयारी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासाठी कंपनीने एक रुपरेषा तयारी केली असून याअंतर्गत 2025 पर्यंत पूर्ण क्षमतेचा वापर करुन 100 टक्के अक्षय ऊर्जा स्थानांतरित करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.
लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण
विविध उपाययोजनांसह शेतकरी आणि पुरवठा क्षेत्राला तसेच पुनउत्पादन शेतीला प्रोत्साहन देणार आहे. सोबत कंपनी येत्या 10 वर्षांच्या कालावधीत पर्यावरणाप्रती जागृत होत लाखेंच्या संख्येने वृक्ष लागवड करणार असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.









