मुंबई
घरात उत्पादनांच्या वाढत्या वापराचा फायदा नेस्लेला यंदा झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून नेस्लेच्या उत्पादनांना चांगली मागणी नोंदवली गेली आहे. मॅगी नूडल्ससह इतर नवी उत्पादनेही नफ्यात वाढ करणारी ठरली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
जानेवारी ते मार्च या तिमाहीत निव्वळ नफ्यात 14 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. पहिल्या तिमाहीअखेर कंपनीचा नफा 602.25 कोटी रुपयावर राहिला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत नफा 525.43 कोटी रुपये होता. जलद विकणाऱया ग्राहकोपयोगी वस्तुंना (एफएमसीजी) कोरोना काळात मोठी मागणी राहिली आहे. ती सध्याही कायम आहे. निव्वळ नफ्यासोबत महसूलही बऱयापैकी म्हणजेच 8.6 टक्क्यांनी वाढून 3 हजार 610 कोटी रुपये झाला आहे.