वार्ताहर / नेसरी
येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण आपल्या दुचाकी वरुन फिरणाऱ्या काही युवकांवर नेसरी पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, अनिल धुळापा नाईक रा. नेसरी होंडा ऍक्टिवा ( एम एच ०९ ई एक्स ५७९४ ) तर युवराज गणपती सुतार रा. नेसरी यांच्यावर विनाकारण दुचाकी फिरवल्यामुळे तसेच गावात आजरा रस्त्यावर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ओंकार शिवानंद नाईक, रोहित दिपक देसाई, वैभव मारुती पाथरवट, महादेव भगवान चव्हाण, अजित सुखदेव चव्हाण, सुनील सतुराम नाईक जिल्ह्यात बंदी आदेश असताना व कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या संचार बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल नेसरी पोलीस ठाण्याचे संजय धराडे, शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरूनपोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








