तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर यांची माहिती
कडेगाव/प्रतिनिधी
नेर्ली तालुका कडेगाव येथील मुंबईहून आलेल्या ५७ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अशी माहिती कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की नेर्ली येथील पती ,पत्नी व मुलगा व मुलगी अशी चौघेजण दिनांक १८ मे रोजी मुंबई येथून आले आहेत . त्यांना त्यांच्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान यापैकी ५७ वर्षीय पुरुषास गुरुवारी कोरोनाची लक्षणे आढळल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांचा स्वॅब घेतला असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती कडेगाव तालुका आरोग्य विभागाला मिळताच त्यांच्या ५१ वर्षीय पत्नीस व २५ वर्षीय मुलगीला कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. दरम्यान कोरिना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या २७ वर्षीय मुलासही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
कडेगाव तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पोहोचली १० वर
कडेगाव तालुक्यातील भिकवडी (खुर्द )येथील ५, सोहोली येथील २ आंबेगाव येथील १, खेराडे वांगी येथील १, आणि नेर्ली येथील १ आशा प्रकारे आतापर्यंत १० लोकांना कोरोनाची बाधा झाली असून भिकवडी येथील ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.