वार्ताहर / कांदोळी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे संगीताच्या तालात मिरवणुकीने काल गुरुवारी जल्लोषी वातावरणात नेरूल येथील श्री सिद्धीविनायक सागर मंदिरातील 21 दिवसाचा सार्वजनिक गणेश बाप्पाला निरोप देण्यात आला. 21 दविसाच्या गणेशोत्सव मंडळातर्फे 21 दिवसही गणेश मूर्तीचे दरवर्षीप्रमाणे पूजन करण्यात आले.
यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने आणि राज्य सरकारने गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आव्हान केल्याने यंदा या ठिकाणी कार्यक्रम होऊ शकले नाही. पारंपरिक मार्गाने थाटामाटात विसर्जनाची मिरवणूक रात्री नेरूल बा फिरंगेभाट त्यानंतर श्री साखळेश्वर मंदिर, भाटीवाडा येथील कलावती आई मंदिर, नेरूल फट्टावाडा तसेच श्री सटीदेवी देवस्थान व इतर वाडय़ावर मिरवणूक रात्री फिरल्यानंतर गणेश बाप्पाला निरोप देण्यात आला.
यावेळी मोठय़ा प्रमाणात गणेश भक्त व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दिंडी व गणेशाचा जयघोष असे जल्लोषी वातावरण नेरूल गावात निर्माण झाले होते. ही विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गणेश भक्तांची उपस्थिती होती. रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. तसेच मोठय़ा प्रमाणात आतषबाजी करण्यात आली होती.









