वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी संकुलात सोमवारपासून सुरू झालेल्या महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन टी-1 निवड चांचणी नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज तेजस्वीनी सावंतने पंजाबच्या अंजूम मोदगीलला मागे टाकत विजेतेपद मिळविले.
टोकियो ऑलिंपिकसाठी दोन नेमबाजांच्या तिकीट मिळविण्यासाठी सुरू असलेल्या लढतीमध्ये महाराष्ट्राची माजी विश्वविजेती महिला नेमबाज तेजस्वीनी सावंतने महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन टी-1 प्रकारात 458.7 गुणांसह पहिले स्थान मिळविले. अंजूम मोदगीलने 457.8 गुणांसह दुसरे स्थान तर मध्यप्रदेशच्या सुनिधी चौहानने तिसरे स्थान घेतले.









