ऑनलाईन टीम / काठमांडू :
वाढत्या वायू प्रदूषणामुळे नेपाळ सरकारने देशातील सर्व शैक्षणिक संस्था 2 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.
सध्या काठमांडू खोऱ्यातील हवेच्या शुद्धतेत लक्षणीय घट झाली आहे. आतापर्यंतची प्रदूषणाची ही सर्वात वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांनी घरातच राहून प्रदूषणापासून आपला बचाव करावा, असे नेपाळ सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, वायू प्रदूषणामुळे 2019 मध्ये नेपाळमध्ये 22 टक्के नवजात बालकांचा जन्म झाल्यानंतर एका महिन्याच्या आत मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणूूून नेपाळ सरकारने 2 एप्रिलपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.









