ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळमध्ये पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद बरखास्त केली आहे. तसेच मध्यावधी निवडणुकांचीही घोषणा केली.
पंतप्रधानांनी संसदीय मंडळ, केंद्रीय समिती आणि पक्ष सचिवालय येथे बहुमत गमावले आहे. पंतप्रधानांनी यावर उपाय शोधण्याऐवजी आज सकाळी तातडीने मंत्रिमंडळाने बैठक घेऊन त्यात संसद बरखास्त करण्याच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतींनीही संसद बरखास्त करण्याची शिफारस मान्य केली.
अशा प्रकारे संसद बरखास्त करण्याची घटनेत तरतूद नाही. त्यामुळे या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. असे नेपाळमधील सत्ताधारी डाव्या पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बिश्नू रिजाल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.









