ऑनलाईन टीम / काठमांडू :
भोपाळनंतर नेपाळ सरकारनेही पतंजली निर्मित ‘कोरोनिल किट’च्या वितरणावर बंदी घातली आहे. कोरोनिल हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे.
नेपाळ सरकारने म्हटले आहे की, बाबा रामदेव यांनी नेपाळला कोरोनिलचे 1500 किट मोफत पाठवले होते. या किटमध्ये असलेले औषधे आणि नाकात दिले जाणारे तेल हे कोरोनावर प्रभावी नाही. तसेच ते इतर कोरोना औषधांच्याही बरोबरीचेही नाही. इंडियन मेडिकल असोसिएनशनने कोरोनिलवर घेतलेल्या आक्षेपाची दखलही नेपाळने घेतली आहे. नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनिलच्या 1500 किट खरेदीत योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही.
दरम्यान, नेपाळमध्ये पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.









