वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळच्या पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना समान वेतन देण्याचा निर्णय नेपाळच्या फुटबॉल संघटनेच्या नियंत्रण समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे आता नेपाळच्या महिला फुटबॉल संघाच्या वेतनश्रेणीमध्ये 150 टक्के वाढ होणार आहे.
यापूर्वी नेपाळच्या पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंच्या वेतनश्रेणीमध्ये खूपच तफावत होती. आता या देशातील पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंना वेतनश्रेणीच्या संदर्भात समान लेखले जाणार आहे. नेपाळप्रमाणेच यापूर्वी इंग्लंड, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि न्यूझीलंड फुटबॉल संघटनांनी आपल्या देशातील पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंना समान वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. नेपाळच्या फुटबॉल संघाने गेल्या वषी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळवित फिफाच्या मानांकनात 99 वे स्थान पटकाविले होते.









