वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार ग्यानेंद्र मल्ला तसेच उपकर्णधार दिपेंदर सिंग एरी व आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाल्याचे नेपाळ क्रिकेट संघटनेतर्फे सांगण्यात आले.
नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सराव शिबिराला तेथे येत्या काही दिवसात प्रारंभ केला जाणार असल्याने या संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चांचणी बुधवारी घेण्यात आली. कोरोना चांचणीमध्ये संघाचा कर्णधार 30 वर्षीय ग्यानेंद्र मल्ला उपकर्णधार दिपेंदर सिंग आणि रोहित पॉडेल हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. नेपाळच्या या क्रिकेटपटूंना काही दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातील, असे नेपाळ क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.









