बेळगाव : एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे दि. 29 रोजी सायंकाळी 6 वा. सेमिनार हॉलमध्ये नेत्रा जोशी यांच्या गायनाची मैफल होणार आहे. याप्रसंगी डॉ. सिद्धराम महास्वामी व डॉ. अल्लमप्रभू महास्वामी उपस्थित राहणार आहेत.
नेत्रा यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
नेत्रा यांनी सुनीता पाटील यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर अर्चना बेळगुंदी यांच्याकडे तालीम घेतली. या दोघींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनातील ज्युनियर ग्रेड व विशारद या पदव्या घेतल्या. पंडित गुरुराज मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्वतपूर्व ही पदवी घेतली. गेल्या 15 वर्षांपासून कन्नड साहित्यभवन येथे त्या संगीताचे वर्ग घेतात. भरतेश हायस्कूलमध्ये त्यांनी संगीत शिक्षिका म्हणूक काम पाहिले. अनेक ठिकाणी त्यांच्या गायनाच्या मैफली झाल्या असून राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार, राजीव गांधी युवा पुरस्कार मिळाले आहेत.









