बेंगळूर/प्रतिनिधी
येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी येत्या काळात चारित्र्य हनन होण्याच्या भीतीने ते रोखण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असल्याचे शनिवारी अवजड उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकदा चुकीची माहिती प्रसारित झाल्यावर प्रतिष्ठा लयास जाते त्यांनतर कोणालाही त्याची प्रतिष्ठा परत मिळवता येत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती रोखण्यासाठी सहा मंत्र्यांनी कोर्टाकडे धाव घेतली आहे आणि त्यात काहीही चूक नाही, असे ते म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना शेट्टर म्हणाले की, भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश यांच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असे ट्टर म्हणाले. संगमेश यांना सभागृहात शर्ट काढल्याने सभापतींनी संगमेष यांना सात दिवसांसाठी निलंबित केला आहे. ते निलंबन रद्द करण्यासाठी काँग्रेस नेते दबाव आंत आहेत.
स्पीकरचा निर्णय अंतिम आहे आणि त्यावर चौकशी करता येणार नाही, असे ते म्हणाले. सभापतींना धमकी देणे म्हणजे विशेषाधिकारांचे उल्लंघन होते. संगमेश हे आमदार होण्यासाठी तंदुरुस्त नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
रमेश जारकीहोळी प्रकरणावर बोलताना आपला भाऊ बाळचंद्र जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याच्या रमेश जारकीहोळी यांच्या अटी बद्दल विचारले असता शेट्टर यांनी आपण अशा विषयांवर जनतेत चर्चा करणार नाही. पक्ष त्यावर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.









