प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर येथील नेताजी को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. प्रारंभी नेताजी सोसायटीचे हितचिंतक कै. सिद्धोजी मुरकुटे व नवहिंद सोसायटीचे संस्थापक वाय. बी. चौगुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सोसायटीच्या संचालिका अस्मिता पाटील, जयश्री कानशिडे यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सर्व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, माजी चेअरमन भरत मुरकुटे व माजी व्हा. चेअरमन के. एन. पाटील यावेळी व्यासपीठावर होते. प्रास्ताविक संस्थेचे संचालक संजय मजुकर यांनी केले. माजी चेअरमन भरतकुमार मुरकुटे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर सेपेटरी दीपक हट्टीकर यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. चांगदेव मुरकुटे यांनी नफा, तोटा पत्रकाचे वाचन केले.
कल्याणी पावले यांनी विभागणी पत्रकाचे वाचन केले. कांचन पाटील यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले. यावषी कोरोनामुळे सोसायटीला केवळ 2 लाखांचाच नफा झाला आहे. यावषी सभासदांना पाच टक्के लाभांश देण्याचे ठरविण्यात आले. सध्या संस्थेकडे 21 कोटींच्यावर ठेवी आहेत. सात कोटींची गुंतवणूक आहे. 45 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. 24 कोटींचे भागभांडवल आहे. विविध अडचणींवर मात करत सोसायटीने प्रगतीचे टप्पे पार केले आहेत.
यावेळी संचालक प्रा. सी. एम. गोरल व के. एन. पाटील यांनी विचार व्यक्त केले. सभेला रविंद्र गिंडे, महेश कानशिडे, परशराम गिंडे, सी. एम. उघाडे, अनिल पाटील, गणपती हट्टीकर, प्रभाकर कणबरकर, किरण गिंडे, मनोहर देसूरकर, बोमाणी छत्र्याण्णावर, विजय धामणेकर, रवी कणबरकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. संजय मजुकर यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी आभार मानले.









