प्रतिनिधी /बेळगाव
माजी नगरसेवक व मराठा समाजातील ज्येष्ठ नेते नेताजी जाधव यांचा सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सार्वजनिक वाचनालय गणपत गल्ली बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी किरण जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, विजय हलगेकर, विशाल कंग्राळकर, उदय पाटील, अक्षय साळवी व मराठा समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.









