प्रतिनिधी / बांदा:
बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने गावात केंद्र सरकारच्या विविध योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. केंद्राच्या विविध योजना लाभार्थीपर्यंत पोहचवल्या जात आहेत.केंद्र सरकारच्या पंचायत राज व ग्रामविकास मंत्रालयच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेल्या नॅशनल लेव्हल मॉनिटर टीम ने बांदा ग्रामपंचायत सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाचे विशेष कौतुक केले. यावेळी केंद्राच्या वतीने पाहणी साठी आलेल्या पथकासमोर ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या. घरकुल योजना, पेन्शन योजना ,रोजगार हमी योजना यांच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. तर बांदा शहरात केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या घरकुल, विहीर, शेती आदीसह इतर कामाची पाहणी केली. तसेच यावेळी लाभार्थी सोबत सवांद साधला.यावेळी सरपंच अक्रम खान यांनी घरकुल योजना साठी मिळत असलेली रक्कम महागाई मुळे कमी पडत असून त्यात वाढ होऊन मिळावी अशी मागणी केली. यावेळी जि प सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, संस्थेचे प्रतिनिधी ज्ञानसुंदरवेल शिवनाथन, एस अबिद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सागर सावंत, डिस्ट्रिक्ट प्रसाद कांबळे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, जावेद खतीब, शाम मांजरेकर, उमांगी मयेकर, किशोरी बांदेकर, साई काणेकर, राजेश विरनोडकर, अधीक्षक जितेंद्र पाटील,सुनील खरवत, उद्देश सावंत, वाडीकर, नम्रता परब, संजीवनी चव्हाण, तलाठी वर्षा नाडकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.









