ग्राहकांना विविध टप्प्यावर मिळणार लाभ – 30 सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणने (पीएफआरडीए) अटल पेंशन योजना (एपीवाय) आणि नॅशनल पेंशन सिस्टम (एनपीएस) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीत मागील वर्षभरात (30 सप्टेंबर 2021 पर्यंत) सदर योजनांमध्ये जोडले जाणाऱयाची संख्या ही 24 टक्क्यांनी वधारली असल्याचे दिसून आले आहे. यासोबतच एनपीएसच्या विविध योजनांमध्ये सबस्क्राइबर्सची संख्या वाढून 4.63 कोटीपर्यंत पोहोचली आहे. एक वर्षाच्या अगोदर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत दोन्ही योजनांशी संबंधीत सबस्क्राईबर्सची संख्या 3.74 कोटी होती.
पीएफआरडीएच्या माहितीनुसार 30 जून 2021 पर्यंत एकूण पेंशन असेट्स अंडर मॅनेजमेंट(एयूएम) 6.67 लाख कोटी रुपये राहिली असून जी वर्षाच्या आधारे 34.84 टक्क्यांची वृद्धी असल्याची माहिती आहे. अटल पेंशन योजनेसोबत सबस्क्राईर्ब्सची संख्या पाहता वर्षाच्या आधारे 32.13 टक्क्यांची तेजी राहिली असून वाढ 3.13 कोटीच्या घरात पोहोचली आहे.
अटल पेंशन योजनेतील पेंशन
अटल पेंशन योजनेच्या अंतर्गत 60 वर्षांचे वय झाल्यानंतर प्रती महिना 1000 रुपये ते 5000 रुपयाची पेंशन मिळते. यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत व्यक्ती गुंतवणूक करु शकणार आहे. कोणत्याही व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करावयाची असल्यास कमीत कमी 20 वर्षासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
एनपीएस हा एक पर्याय
एनपीएसमध्ये 10 ते 60 वर्षापर्यंत कोणत्याही व्यक्तीचा समावेश होऊ शकतो. कोणीही यामध्ये आपल्या या खात्यामध्ये नियमीतपणे योगदान देऊ शकते. साठलेल्या पैशांपैकी एक भागाचा हिस्सा हा काढण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.









