कुरुंदवाड / प्रतिनिधी
परिसरात पडलेल्या पाऊस व धरण क्षेत्रातील विसर्गामूळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 7 फुटाने वाढ झाली. येथील दत्त मंदिरात आज सकाळी पाणी आले व दुपारी 4.30 वाजता चालू सालातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अजूनही दर्शनासाठी बंदच असल्याने या सोहळ्याचा भाविकांना लाभ घेता आला नाही.
गेले काही दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात 7 फुटाने वाढ झाली. पाणी पातळीत वाढ झाली. नदीच्या पाणी पातळीने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावरील संगमेश्र्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मंदिरात नदीचे पाणी असलेने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवणेत आली असून तेथे त्रिकाळ पुजा चालू आहे.









