प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड नृसिंहवाडीसह दत्तवाड , घोसरवाड , नवे दानवाड , जुने दानवाड, गौरवाड येथे आज शनिवारी एकूण १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कुरुंदवाड परिसरात सापडले कोरोना रुग्णाची वाढती संख्या पहाता नागरिकांतून भीतीचे वातावरण आहे. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यांचे तर्फे प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहे.
कुरुंदवाडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल चालू असताना पुन्हा जनसंपर्क असलेले २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. नृसिंहवाडीत त्या मृत महिलेच्या संपर्कातील २ व्यक्तीपॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत दत्तवाड १० , घोसरवाड , नवे दानवाड , जुने दानवाड व गौरवाड येथे प्रत्येकी १ रुग्ण तर रेंदाळहुन शिरोळ तालुक्यात आलेला १ नागरिक पॉझिटिव्ह आढळला आहे.
अशी कुरुंदवाड परिसरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या १९ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पहाता प्रशासन लॉकडाऊनचा आधार घेत आहे यामुळे गेले १६ दिवस सर्व व्यवहार ठप्प आहेत. सर्व सामान्यांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे सोमवारपासून जिल्ह्यात ७ दिवस लॉकडाऊन होणार आहे असे जाहीर झाले आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
Previous Articleसोलापूर ग्रामीण भागात 179 कोरोना रुग्णांची भर, दोन मृत्यू
Next Article सांगली : तिघांचा मृत्यू, नवे 48 रूग्ण








