नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात करणार काम
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रीति सेनॉन हिने चित्रपटजगतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच तिची बहिण नुपुर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहेत. नुपुरने यापूर्वी काही म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. नुपुर पंजाबी चित्रपट ‘काला शाह काला’च्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाला सध्या ‘नुरानी चेहरा’ हे नाव देण्यात आले आहे.

चित्रपट निर्मितीची तयारी सुरू झाली आहे. याची निर्मिती पॅनोरमा स्टुडिओ, वाइल्ड रिव्हर पिक्चर्स आणि पल्प फिक्शन एंटरटेनमेंटद्वारे केली जातेय. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवरून एक पोस्ट शेअर केली असून यात तो नुपुरसोबत दिसून येतोय. नुपुरने यापूर्वी अभिनेता अक्षय कुमारसोबत दोन म्युझिक व्हिडिओ ‘फिलहाल 1’ आणि ‘फिलहाल 2’मध्ये काम केले होते.
तर नवाजुद्दीन सिद्दीकीचे अनेक चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत. यात ‘नो लँड्स मॅन’, ‘बोले चूडियाँ’, ‘जोगीरा सारा रा रा’, ‘हीरोपंती 2’ आणि ‘टिकू वेड्स शेरू’ सामील आहे.









