वृत्तसंस्था/ लंडन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या क्विन्स क्लब पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा कॅमेरून नुरी आणि इटलीचा मॅटो बेरेटीनी यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात ब्रिटनच्या नुरीने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 7-5, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱया उपांत्य सामन्यात इटलीच्या बेरेटीनीने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरवर 6-4, 6-4 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे.









