बेळगाव / प्रतिनिधी
गेल्यावषी झालेल्या पुरामुळे आम्हाला फटका बसला असून, अद्याप आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. तेव्हा ही नुकसान भरपाई त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी उगार खुर्दच्या नागरिकांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱयांना गुरूवारी दिले.
याबबात आम्ही ग्राम लेखाधिकाऱयांना सातत्याने निवेदन दिले आहे. परंतु त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. तसेच तहसीलदारांनाही दोनवेळा निवेदन दिले आहे. त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी अन्न सत्याग्रह करू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.









