बेंगळूर/प्रतिनिधी
सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या मोबदल्याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक तीन ते चार दिवसांत कर्नाटकला भेट देईल.
याविषयी माहिती देताना महसूलमंत्री आर. अशोक यांनी यावर्षी तीन टप्प्यात राज्यात पूर आला होता. पहिला पूर ऑगस्ट १ ते १५ सप्टेंबर दरम्यान होता तर दुसरा व तिसरा टप्पा १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान होता. दुसर्या ते तिसर्या टप्प्यात पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यात पूर परिस्थिती हाती. दरम्यान केंद्रीय पथक सर्व पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असून नुकसानीच्या पातळीचे मूल्यांकन केले जाणार आहे.
गुरुवारी विधानसभेत यासंदर्भात चर्चेला उत्तर देताना मंत्री अशोक यांनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासंदर्भात प्रभारी पथकाबरोबर सल्लामसलत करण्यासाठी ते मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या सोबत सामील होतील, असे ते म्हणाले.









