चव्हाट गल्ली येथील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
मिरची व्यापारात झालेल्या नुकसानामुळे चव्हाट गल्ली येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मुजम्मील आयुब संगोळी (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास मुजम्मीलने सिलिंग हुक्कला कपडय़ाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.
मुजम्मील हा पहिल्या मजल्यावरील खोलीत झोपला होता. त्याच्या कुटुंबियांनी बुधवारीसकाळी पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. वडिलांचा रविवारपेठ परिसरात मिरचीचा व्यवसाय आहे. व्यवसायातील नुकसानीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे वडिल आयुब यांनी मार्केट पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.









