आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडून
वार्ताहर / अगसगे
सतीश फौंडेशनच्या माध्यमातून आमदार सतीश जारकीहोळी यांनी अगसगे केदनूर, मणिकेरी येथील शेतकऱयांच्या गवतगंजींना आग लागून नुकसान झालेल्या शेतकऱयांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून वळीव पावसामुळे वीज कोसळून तर काही गवत गंजींना अचानक आग लागल्याची घटना अगसगे, केदनूर व मणिकेरी गावामध्ये घडली. यामुळे पुन्हा शेतकऱयांना चारा खरेदी करावा लागणार आहे. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याने शेतकरी हवालदिल झ्घला होता. याची माहिती आमदारांचे स्विय साहाय्यक मलगौडा पाटील यांनी आमदारांना कळविली. आमदार सतीश जारकीहोळी यांनी सतीश फौंडेशनच्यावतीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची अर्थिक मदत देण्यात आली. गुरुवार दि. 7 रोजी हनुमाननगर येथील आमदारांच्या निवासस्थानी आमदारांचे चिरंजीव राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते नऊ शेतकऱयांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोखरक्कम देण्यात आली. यामध्ये अगसगेचे शट्टू घेवडी, शट्टू गडकरी, नागो घेवडी, शिवाजी बच्चेनट्टी, परशराम कांबळे, सतीश मेत्री हे शेतकरी तर मणिकेरीचे गौरव्वा हडलगी, भरमा हडलगी तर केदनूरचे महादेव संभाजी या शेतकऱयांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी माजी जि. पं. सदस्य अरुण कटांबळे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, सेवादल राज्य सहसचिव शिवपुत्र मेत्री अगसगे ग्रा. पं. सदस्य अपय्यगौडा पाटील, अमृत मुद्देन्नवर, गुंडू कुरेन्नवर आदी उपस्थित होते.