कणकवली / प्रतिनिधी –
तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली मदतीकरिता धावून आले आहेत. त्याने नुकसानग्रस्त घरांसाठी घरांसाठी शंभर पाण्याच्या टाक्या व 1000 ताडपत्री उपलब्ध करून दिले आहेत. या ताडपत्री भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपा मंडल अध्यक्ष यांचेकडे सुपूर्द केल्या. त्यावेळी जिल्ह्य सरचिटणीस बाळू देसाई, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष विनायक गवंडळकर,देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे ,वैभववाडी मंडल अध्यक्ष नासिर काझी, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, पप्पू पुजारे, पंढरी वायगंणकर ,देवेन सामंत, समर्थ राणे, प्रसाद देसाई, प्रवीण पाटील, अजय घाडीगावकर, उपस्थित होते.









