रायगड दौऱयात फडणवीसांची मागणी
प्रतिनिधी/ खेड
तौक्ते चक्रीवादळाचा फटका राज्यातील काही जिह्यांना कमी-जास्त प्रमाणात बसल्याने यावेळी शासनाने भरघोस मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कोळी व्यावसायिकांच्या बोटींसह इतर खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान रायगड जिह्यात खूप झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांची बुधवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक झाली. आढावा बैठक झाल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अलिबाग येथील कोळीवाडय़ातील घरांचे तसेच बंदरातील बोटींचे मोठय़ा प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर अलिबाग तालुक्यातील खानाव येथील पडलेली पाण्याच्या टाकीची पाहणी करून ते रोह्याला रवाना झाले.









