ऑनलाईन /टीम
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. नीरज पात्रता फेरीत आपल्या गटात अव्वल होता. २३ वर्षीय नीरज चोप्राने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. बुधवारी झालेल्या पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, आज झालेल्या अंतिम फेरीदरम्यान नीरजने पहिल्याच फेरीत ८७.०३ मी एवढ्या लांब भाला फेकला . त्यांनतर दुसऱ्या फेरीत तर नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकला आणि जवळपास पदक निश्चित केले होते. तिसऱ्या फेरीत नीरजने ७६.७९ मीटर भाला फेकला होता, पण दुसऱ्या फेरीतील त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. चौथ्या फेरीत नीरजचा फाऊल झाला होता, पण तरीही तो अव्वल स्थानावरच होता. अखेर नीरजने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.









