नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नीट परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र परीक्षा मंडळाकडून वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे. परीक्षार्थी हूहू.हग्म्.ग्ह या वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने अलीकडेच यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. यावषी एकूण 15.97 लाख उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सुरक्षा प्रोटोकॉल राखण्यासाठी नीट 2020 ची परीक्षा केंदे दुप्पट करण्यात आली आहेत. त्यानुसार यावेळी ती 2,546 वरुन 3,843 करण्यात आली आहेत. परीक्षा हॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक वर्गातील उमेदवारांची संख्या 24 वरून 12 करण्यात आली आहे.









