ऑनलाईन टीम / पुणे :
अरबी समुद्रात घोगांवणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाने अखेर अलिबागमध्ये आज दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास धडक मारली. कोकण किनारपट्टीला जोरदार धक्के देणारे हे चक्रीवादळ वेगाने कूच करीत अलिबागला धडकले.
या चक्रीवादळाच्या प्रभावाने अनेक भागांतील झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घरांचेही पत्रे उडाले आहेत. या वाऱ्याचा वेग अधिक असल्याने हे वादळ भीषण रूप धारण करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी ‘निसर्ग’ या चक्रीवादळात रुपांतर झाले. काल या वादळाचा वेग ताशी 6 किमी होता. तो आज सकाळी वाढून ताशी 130 किमी पर्यंत पोहचला होता.









