प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर तालुक्मयातील हिडकलसारख्या ग्रामीण भागात राहून शिक्षण घेऊन नवविभागात आप्पोजी यल्लाप्पा पाटील यांनी नोकरी केली. वनाधिकारी म्हणून त्यांनी 38 वर्षे उत्तम सेवा बजावली. त्यानंतर ते अलीकडेच निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री सुवर्णपदक बहाल करण्यात आले आहे.
आप्पोजी पाटील हे एका शेतकरी आणि गरीब कुटुंबात जन्मले. त्यांनी गरिबीवर मात करत शिक्षण घेतले. नोकरीच्या शोधात असताना वनविभागात रक्षक म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. त्यानंतर वेगवेगळय़ा परीक्षा देत वनाधिकाऱयांपर्यंत मजल मारली. 38 वर्षे कार्यतत्पर आणि दक्षतेने त्यांनी सेवा बजावली. त्याबद्दल त्यांना हे मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे खानापूर तालुक्मयातून अभिनंदन होत आहे.









