बेंगळूर
आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱयांप्रमाणेच निवृत्त पोलिसांना देखील ओळखपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी पोलीस खात्याला यासंबंधीचा आदेश दिला आहे. सामान्य पोलिसांपासून जिल्हा पोलीस प्रमुख पदापर्यंतच्या सर्व निवृत्त पोलिसांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. याच्या आधारे सरकारी कार्यालये, कॅन्टीन किंवा प्रवासावेळी उपयोग होणार आहे
पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची कार्यालये, सीआयडी, पोलीस प्रशिक्षण, अंतर्गत सुरक्षा विभाग, राज्य गुप्तचर विभाग आणि इतर विशेष विभागात सेवा बजावून निवृत्त होणाऱयांनी ओळखपत्रे वितरीत होणार आहेत. त्यामध्ये नाव, निवृत्तीवेळी असणारे पद, रक्तगट, निवृत्तीची तारीख व इतर माहिती नमूद करण्याची सूचना पोलीस खात्याला देण्यात आली आहे.









