वार्ताहर / शिये
शिये जिल्हा परिषद मतदार संघातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल त्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखांचा जादा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी सांगितले.
कोरोनामुळे ग्रामपंचायतीसह विविध संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे निवडणुकीत ईर्षा लागली की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होणार आहे. तो पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी. तसेच शिये जिल्हा परिषद मतदार संघातील शिये, निगवे दुमाला, भुयेवाडी, केर्ली,पडवळवाडी, रजपूतवाडी या सहा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूका बिनविरोध कराव्यात असे आवाहनही कुरणे यांनी केले आहे.









