प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणाच्या पहिल्या फेरीदरम्यान रत्नागिरी येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होत़ा यामुळे सावध झालेल्या प्रशासनाने निवडणूक प्रशिक्षणाच्या दुसऱया फेरीसाठी खबरदारी घेतल्याचे दिसून येत आह़े यावेळी निवडणूक प्रशिक्षणासाठी कमी कर्मचारी सावरकर नाटय़गृहामध्ये प्रशिक्षण घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े
गेल्या रविवारी शहरातील सावरकर नाटय़गृहामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणाच्या नियोजनात गोंधळ उडाला होत़ा एकाच छताखाली मोठय़ा प्रमाणामध्ये प्रशिणार्थी कर्मचारी जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होत़ा जिह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नियुक्त केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदींसाठी प्र†िशक्षण कार्यक्रम होती घेण्यात आला आह़े मात्र 3 जानेवारी रोजी झालेल्या आयोजनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांकडे कानाडोळा करत 950 क्षमतेच्या नाटय़गृहात 1 हजारहून अधिक मंडळींना बसवण्यात आले. याबाबत प्रक्षिक्षणार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या बाबतचे वृत्तही ‘तरूण भारत’ने प्रसिध्द केले होते.
मागील प्रशिक्षण प्रारंभी सावरकर नाटय़गृह व दामले विद्यालय या दोन ठिकाणी होणार होत़े मात्र यात बदल करत निवडणूक प्रशिक्षण सावरकर नाटय़गृह येथे एकाच ठिकणी घेण्याचे आल़े एकाच ठिकाणी मोठय़ा संख्येने प्रशिणार्थी कर्मचारी दाखल झाल्याने सोशल डिस्टन्सिंगाचा बोजवारा उडाला होत़ा मात्र रविवार 10 जानेवारी रोजी होणाऱया दुसऱया प्रशिक्षणात सोशल ड्स्टिन्सिंग आणि सॅनिटायझेशनची विशेष काळजी घेण्यात येणार असून निवडणूक प्रशिक्षणासाठी कमी कर्मचारी सावरकर नाटय़गृहामध्ये सहभागी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े









