प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातफ्xढ राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यांना मतदारयादी उजळणी, सुधारण याची वेळापत्रकासह तपशिलवार माहिती पुरवण्यात आली. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी), गोवा फॉरवर्ड महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) या पाच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी हजर होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी सांगितले, की मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना प्रतिनिधी बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. एकूण पाच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी उपस्थिती लावली. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून मतदान यंत्रेही राज्यात पोहोचली आहेत. त्यांची प्रथम तपासणीफ्sढरी 26 ऑक्टोबर रोजी होणर असून त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय पक्ष प्रतिनिधींना बोलावले जाणर आहे.
येत्या 1 नोव्हेंबर रोजी मतदारयादी मसुदा प्रकाशित करण्यात येणार असून 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आक्षेप, सुचना तक्रारी गाऱहाणी, नावात दुरूस्ती, नावे कमी करणे नाव नोंदवणे ही कामे करण्यात येणार आहेत. दि. 20 व 27 नोव्हेंबर रोजी खास मतदान केंदावर ही कामे करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रकाशित होणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
गोव्यात आलेली मतदान यंत्रे कर्नाटकात मतदानासाठी वापरण्यात आली होती असे त्यांनी नमुद केले.








