प्रतिनिधी/ रत्नागिरी
निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ करणाऱया जिल्हा परिषद कर्मचाऱयावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गौरी सचिन टकेल (30) असे या कर्मचाऱयाचे नाव आह़े टकेल या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत़
या प्रकरणी शासकीय अधिकारी माधवी रमेश कांबळे (47, ऱा फगरवठार रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होत़ी या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 ते 27 जानेवारी 2020 दरम्यान टकेल यांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होत़ी मात्र टकेल यांनी आपल्याला दिलेले काम करण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले होत़े या प्रकरणी टकेल यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील कलम 32 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरचकर करत आहेत़









